Gai mahis vatap 12 lakh | दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी राज्य सरकार करणार 12 लाख जनावरांचे वाटप वाचा सविस्तर माहिती..!

Gai mahis vatap 12 lakh : शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कीटकनाशकांची उपलब्धता व सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतमालाला बाजारपेठ मिळवून देऊन शेतीशी निगडित उद्योग उभारणीत उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील,

Gai mahis vatap 12 lakh

असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. वरोरा येथील क्रीडा संकुलावर आयोजित विदर्भ प्रादेशिक शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Gai mahis vatap 12 lakh केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, वैनगंगा फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मागील 2 वर्षात विशेषत: चंद्रपूर आणि वरोरा तालुक्यात उत्कृष्ठ काम झाले याचा आनंद आहे याचा विशेष आनंद आहे.

जिल्ह्यातील 52 शेतकरी उत्पादक कंपन्या महासंघाशी जोडल्या गेल्या आहेत. महासंघाच्यावतीने सर्व कंपन्यांना नवनवीन योजनांची माहिती देऊन नवीन उद्योग उभारणीसाठी सातत्याने प्रयत्न केल्या जात आहे.

Gai mahis vatap 12 lakh फार्मर प्रोड्युसर कंपन्या शेतकऱ्यांचे भवितव्य आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांचे कार्य वाढवावे, त्यातून शेतकऱ्यांचा नक्कीच विकास होईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना नेतृत्व देऊन फार्मर प्रोडूसर कंपन्या तयार केल्यास शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल व दलालाच्या कचाट्यातून सुटका होईल.

तसेच विविध उत्पादनाला भारतीय बाजारपेठ तर मिळेलच पण निर्यात देखील मोठ्या प्रमाणावर होईल, असेही त्यांनी सांगितले.

Gai mahis vatap 12 lakh जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी राज्य सरकार 12 लाख गायी देणार आहे. गोटफार्मच्या धर्तीवर काऊ फार्म तयार करावा व दुध उत्पादनाच्या वाढीस चालना द्यावी.

वर्षभर हिरवा चारा मिळाल्यास दूध उत्पादन वाढेल यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी पशुखाद्यासाठी पुढाकार घ्यावा. चांगल्या गुणवत्तेचे पशुखाद्य कमी दरात विकल्यास त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होईल,

याकरीता 20 ते 25 पशुखाद्याचे कारखाने लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Gai mahis vatap 12 lakh पूर्व विदर्भात साडेसहा हजार मालगुजारी तलाव आहेत. या तलावात मत्स्य व्यवसाय केल्यास करोडोने उत्पन्न वाढेल. येणाऱ्या काळात मत्स्य उत्पादनाला सामोरे जायचे आहे.

तसेच गहू, तांदूळ, कापूस लावून शेतकऱ्यांचे भले होणार नसून यासाठी क्रॉप पॅटर्न बदलण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Leave a Comment