Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List | महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023 मराठी

महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना 2023 माहिती मराठी | महाराष्ट्र सरकारी योजना | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी लिस्ट | महात्मा ज्योतिबा फुले योजना महाराष्ट्र | किसान कर्ज माफी लिस्ट | शेतकरी कर्ज माफी यादी महाराष्ट्र

Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List : जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिला शेतकरी सर्वांसाठी अन्न पिकवतो, शेतीमध्ये काबाड कष्ट करतो काम करून धान्य पिकवतो शेतकऱ्यांमुळे सर्वांना अन्न मिळते.

आपल्याला माहितच आहे, शेतकरी त्यांच्या शेतात अहोरात्र काबाड कष्ट करून अन्नधान्य, भाजीपाला पिकवतो.

शेतकरी कशाचीही काळजी न करिता उन असो कि वारा ते फक्त आपले काम करत असतात,

इतके काबाड कष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवत असतो परंतु त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही,

त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही / दिला जात नाही तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्याप्रमाणात नुकसान होते.

कधी अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकांचे नुकसान होते तर कधी शेतीसाठी पाण्याअभावी त्यांच्या पिकांचे नुकसान होते,

या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हैराण होतो, त्यामुळे या सर्व कारणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

आणि शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे.

वाचक मित्रहो आपण या लेखामध्ये महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2023 या योजने संबंधित संपूर्ण माहिती जसे की योजनेसाठी लागणारी पात्रता.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया इत्यादी माहिती पाहणार आहोत.

Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List

Table of Contents

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023 मराठी | Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List

राज्यात मागील काही वर्षापासून दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती, आणि 4 वर्षी काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते.

तसेच राज्यातील काही भागात अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते.

महाराष्ट्र राज्यात एकूण 153 लाख शेतकरी आहेत, हे शेतकरी शेती आणि शेतीच्या संबंधित गरजा पूर्ण करण्याकरिता व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेत असतात.

मागील काही वर्षात विविध भागात दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे आणि अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्यामुळे तसेच या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या संबंधित असलेल्या बँकांच्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही,

त्यामुळे राज्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे तसेच यामुळे त्यांना नव्याने शेती संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी पिक कर्ज मिळण्यात खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या.

माननीय मुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशन 2019 मध्ये महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती.

आणि या योजनेच्या अंतर्गत सप्टेंबर 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पिक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पिक कर्जाचे पुनर्गठन / फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हि कर्जमुक्ती योजना सुरु केली होती.

SHRESTHA Yojana: ऑनलाइन अर्ज, फायदे, पात्रता आणि रजिस्ट्रेशन संपूर्ण माहिती

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2023 संपूर्ण तपशील:

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 21 डिसेंबर 2019 मध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेचा शुभारंभ केला,

आणि या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील एप्रिल 2015 ते मार्च 2019 पर्यंत उचललेल्या अल्पमुदत पिक कर्जाची रक्कम, दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत १ किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात मुद्दल आणि व्याजासहित थकीत असेल,

अशी परतफेड न झालेली अल्पमुदत पिक कर्जाची रक्कम २ लाख पर्यंत आहे, असे शेतकरी जर अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक असले तरी त्यांच्याकडे असलेले शेत जमीन क्षेत्र विचारात न घेता, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 2 लाख रुपये पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

 • या योजनेच्या अंतर्गत एप्रिल 2015 ते मार्च 2019 वितरीत करण्यात आलेल्या अल्पमुदत पिक कर्जाचे पुनर्गठन / फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर केले असेल आणि १ किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल व व्याजासहित थकीत असेल, अशी परतफेड न झालेली कर्जाची रक्कम २ लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.
 • प्रत्येक शेतकरयला कमाल 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत ज्या अल्पमुदत पिक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पिक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेल्या कर्जखात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30 सप्टेंबर रोजी थकबाकीची रक्कम 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशी कर्जखाती आहेत त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही.
 • या योजनेसाठी १ राज्यस्तरीय देखरेख व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल, नियोजन विभाग, यामध्ये वित्त विभाग, सहकार विभाग, यांचे सचिव तसेच रिझर्व बँक, नाबार्ड व राष्ट्रीयकृत बँक यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.
 • या योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीयकृत, खाजगी, व ग्रामीण बँकांच्या शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पिक अनुउत्पादित कर्जांना किंवा अल्पमुदत पिक पुनर्गठीत अनुउत्पादित कर्जांना (NPA Accounts) कर्जमुक्तीचा लाभ देण्याबाबतचा निर्णय वित्त विभाग व सहकार विभागाचे सचिव स्तरीय समिती नेमून त्यांच्यामार्फत घेण्यात येईल.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2023 Highlights:

योजना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
श्रेणी राज्य सरकारी योजना
लाभार्थी राज्याचे शेतकरी
व्दारा सुरु महाराष्ट्र सरकार
उद्देश्य योजनेचा उद्देश्य आहे शेतकऱ्यांना मजबूत पाठिंबा देणे आणि कर्जमुक्त करणे
तारीख 21 डिसेंबर 2019
राज्यमहाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट mjpsky.maharashtra.gov.in

मागेल त्याला शेततळे योजना 2023 | Magel Tyala Shettale Online Apply

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी लिस्ट अपडेट:

जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारव्दारा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल असे राज्य शासनाव्दारे जाहीर करण्यात आले होते,

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी हि योजना राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना आधार व दिलासा देण्यासाठी सुरु केली आहे.

शासनाकडून अपडेट करण्यात आले कि करोना महामारीमुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विलंब झाला आहे.

परंतु ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

त्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्या सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार उपलोड करून ठेवावे असे शासनाने सांगितले आहे आहे.

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना उद्देश:

समाजात अशी अनेक उदाहरणे दिसून येतील कि जिथे कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करतात त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंबे निराधार होतात, शेतकरी अहोरात्र शेतीमध्ये घाम गाळत असतात शेतीसाठी कष्ट करीत असतात,

राबत असतात ,बहुतांश वेळा येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठयाप्रमाणात नुकसान होते

तर कधी पिकांना भाव मिळत नाही या सर्व समस्यांमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो,

राज्यातील अशा सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी, शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांमधून बाहेर काढण्याच्या दृष्टीने शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना संपूर्ण राज्यात सुरु केली आहे.

या योजनेच्या अंतर्गत राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अल्पमुदतीचे २ लाख रुपयेपर्यंतचे दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत घेतलेले पिक कर्ज राज्य शासनाकडून माफ करण्यात येईल.

तसेच या योजनेचा लाभ राज्यातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांबरोबरच ऊस आणि फळबागांची शेती करण्याऱ्या व इतर पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

आणि या योजनेमध्ये शासनाच्या निर्णयानुसार कर्ज माफीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही अट असणार नाही या संबंधित विवरण भविष्यात मुख्यमंत्री कार्यालातून जारी केले जाईल.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १० हजार कोटी रुपयांचे बजट मंजूर केले आहे.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana 2023 ऑनलाइन अर्ज, रजिस्ट्रेशन, अर्ज PDF डाऊनलोड

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना लिस्ट:

योजनेच्या लाभार्थ्यांची ३ री यादी महाराष्ट्र शासनाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, आणि या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव १ल्या आणि २ऱ्या यादीमध्ये आले नाहीत,

त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजने (MLPSKY) च्या ३ऱ्या यादीत पाहावे. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकर्यांचे नाव योजनेच्या यादीत आहे,

त्यांना या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्हाला जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतमध्ये जावे लागेल.

महाराष्ट्र शासनाने हि योजना छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना या योजनेच्या माध्यामतून पाठींबा, आधार देण्यासाठी राबविली आहे.

MJPSKY लाभार्थी लिस्ट:

योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी १० हजार करोड रुपयांचे बजट जाहीर केले आहे,

आणि 22 फरवरी 2020 पर्यंत महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याचे ठरविले होते,

ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2023 अंतर्गत येतील त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील ज्या छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज केला आहे,

ते शेतकरी लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव पाहू शकतात.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana 2023 ऑनलाइन अर्ज, रजिस्ट्रेशन, अर्ज PDF डाऊनलोड

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कर्जमुक्ती स्थिती:

या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांना आधार कार्डाच्या माध्यमातून उपलोड करून नंतर त्या बँक खात्यांमध्ये धनराशी जमा केल्या गेली होती,

या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे एकूण 7,06,500 बँक खाते उघडण्यात आले आहे, तसेच या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 4739.93 करोड रुपये जमा करण्यात आले आहे, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत अजूनही लाभ मिळालेला नाही त्यांनी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी योजनेमध्ये अर्ज करण्याची आवश्यकता आहे.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना प्रथमचरण:

माननीय मुख्यमंत्री यांनी राज्यातील विधानसभा सत्र समाप्त झाल्यावर जाहीर केले होते कि शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असेल त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सहजतेने आणि सुलभतेने मिळवता येईल,

त्याचप्रमाणे शासनाच्या निर्णयानुसार कर्जमाफीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

आणि शासनाने जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना या योजनेचा प्रथम चरणाला मार्च 2020 मध्ये सुरुवात करण्यात आली.

या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी राज्यातील लाभार्थी शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023 फायदे:

महाराष्ट्र राज्यातील छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी व त्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी शासनाने हि योजना सुरु केली आहे. आणि या योजनेच्या संबंधित माहिती व लाभ खालीलप्रमाणे.

 • महाराष्ट्र महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना २ लाखापर्यंतची कर्ज माफी मिळणार आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत ऊस आणि फळबागांची शेती करणारे शेतकरी आणि पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ शासन देणार आहे.
 • हि योजना महाराष्ट्रातील अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे,आणि त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे
 • 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतचे या योजनेंतर्गत अल्पमुदतीचे पिक कर्ज आणि पुनर्गठीत पिक कर्ज माफ करण्यात येणार आहे.
 • महाराष्ट्र राज्य सरकारव्दारा महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत मिळणारी कर्ज माफीची धनराशी थेट लाभार्थी शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँका, ग्रामीण बँका / व्यापारी बँकांमधून घेतलेले अल्पमुदतीचे पिक कर्ज किंवा पुनर्गठन केलेले पिक कर्ज माफ करण्यात येणार आहे.

PM Kisan Sampada Yojana: ऑनलाइन अर्ज, रजिस्ट्रेशन संपूर्ण माहिती

या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील नागरिक पात्र असणार नाही:

 • महाराष्ट्र राज्यातील आजी / माजी मंत्री / राज्य मंत्री / माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य / माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य.
 • केंद्र आणि राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन 25,000/- रुपयेपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
 • राज्य सार्वजनिक उपक्रम उदाः महावितरण, एस.टी. महामंडळ,
 • इत्यादी व अनुदानित संस्था यांचे अधिकारी आणि कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन 25,000/- रुपयेपेक्षा जास्त असणारे)
 • शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
 • निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25,000/- रुपयेपेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
 • कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुत गिरणी, नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकारी दुध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन 25,000/- रुपयेपेक्षा जास्त असणारे) आणि पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

महात्मा फुले कर्ज योजना 2023 अंमलबजावणी प्रक्रिया:

 • मार्च 2020 पासून बँकांनी आधार कार्ड क्रमांक आणि कर्ज खात्याची रक्कम असलेल्या याद्या नोटीस बोर्डावर तसेच चावडीवर दाखवल्या जातील.
 • महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023 या योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक कर्ज खाते त्यांच्या आधार क्रमांकाबरोबर जोडावे, त्याचप्रमाणे आधार क्रमांक विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी जोडून घ्यावा.(Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List)
 • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाबारोबर युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सोबत ठेवावा लागेल.
 • त्यांच्या आधार क्रमांकाची आणि कर्जाच्या रकमेची पडताळणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रावर जावे लागेल.
 • जर पडताळणीनंतर केल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असेल तर ती कर्ज माफीची रक्कम नियमानुसार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये जमा होईल.(Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List
 • यामध्ये शेतकऱ्यांचे कर्जाची रक्कम व आधार क्रमांक बाबत वेगळे मत असल्यास ते
 • जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडण्यात येणार आहेत. आणि या नंतर समिती निर्णय घेईल आणि अंतिम कार्यवाही करेल.

Maharashtra Smart Ration Card: पात्रता, फायदे, ऍप्लिकेशन PDF संपूर्ण माहिती

महात्मा फुले कर्ज माफी योजना 2023 यादी:

योजनेंतर्गत जिल्हानिहाय यादी जारी केली जाईल, राज्यातील छोट्या आणि अल्पभूधारक शेतकरी

जिल्हानिहाय महात्मा फुले कर्ज माफी योजना लाभार्थी यादी 2023 मध्ये त्यांचा जिल्हा निवडून त्यांची नावे तपासू शकतात.

या योजनेच्या १ल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील २ गावांमधील म्हणजे 68 गावांमधील पात्र

लाभार्थी शेतकऱ्यांची यादी 24 फेब्रुवारीला आणि २री यादी 28 फेब्रुवारीपासून जारी केली जाईल.(Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List) एप्रिल महिन्याचा शेवटी सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाईल.

या MJPSKY जिल्हानिहाय लाभार्थी यादी 2023 मध्ये 30 सप्टेंबर 2019 पर्यंत राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पिकांसाठी

अल्पमुदतीचे कर्ज घेतले आहे त्यांची नावे येतील, आणि त्या शेतकऱ्यांना २ लाख पर्यंतचे पिक कर्ज माफ केले जाईल.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना आवश्यक कागदपत्र:

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी काही महत्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल, कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे.

 • या योजनेच्या अंतर्गत राज्यातील अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
 • सरकारी नोकरी करणारे नागरिक किंवा आयकर भरणारे शेतकरी त्याना योजनेचा लाभ मिळणार नाही
 • बँक खात्यावर फक्त लाभार्थींची सही /अंगठ्याचा शिक्का असावा.(Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List)
 • राज्यातील ऊस आणि फळबागांची शेती करणारे व इतर पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेच लाभ मिळणार आहे.
 • अधिवास प्रमाणपत्र
 • आधार कार्ड
 • मोबाईल नंबर
 • बँक खाते
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

महत्मा फुले कर्जमाफी योजना कर्जमाफी मंजूर जिल्हे:

 • मुंबई
 • सांगली
 • औरंगाबाद
 • सातारा
 • हिंगोली
 • पालघर
 • अमरावती
 • भंडारा
 • ठाणे
 • नांदेड
 • परभणी
 • नाशिक
 • जळगाव
 • रत्नागिरी
 • वाशीम
 • अहमदनगर
 • उप नगरे
 • मुंबई
 • गडचिरोली
 • उस्मानाबाद
 • सिंधुदुर्ग
 • यवतमाळ
 • सोलापूर
 • नागपूर
 • पुणे
 • लातूर वर्धा
 • गोंदिया
 • बुलढाणा
 • रायगड
 • चंद्रपुर
 • नंदुरबार
 • जालना
 • बिड
 • धुळे कोल्हापूर
 • अकोला

SHRESTHA Yojana: ऑनलाइन अर्ज, फायदे, पात्रता आणि रजिस्ट्रेशन संपूर्ण माहिती

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:

महाराष्ट्र राज्यातील ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2022 या योजनेचा लाभ मिळवायचा आहे.

त्यांनी या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा त्यासाठी त्यांना योजनेसाठी,

लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करून उदाः आधार कार्ड,

बँक पासबुक इत्यादी कागदपत्र घेऊन जवळच्या बँकेत जाऊन योजने संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण करावी.

योजने संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या आधार संलग्न बँकेच्या खात्यात कर्ज माफीची रक्कम जमा केली जाईल

अशा प्रकारे तुमची या योजनेमध्ये ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.(Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List)

 • प्रथम तुम्हाला जवळच्या बँकेत जावे लागेल, ज्या बँकेत तुम्हाला खाते उघडायचे आहे.
 • यानंतर बँकेमध्ये पूर्ण प्रक्रिया करून खाते उघडावे.
 • तुमचे खाते बँकेत उघडल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन बँकेत जावे लागेल.
 • धनराशी तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
 • महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेसाठी कोणतीही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया नाही, अर्ज करण्यासाठी लाभार्थी अर्जदारांना जवळच्या बँकेत जावे लागते.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना लाभार्थी यादी कशी पहावी ?

 • प्रथम या योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट द्यावी, वेबसाईटवर भेट दिल्यावर तुमच्यासमोर होम पेज उघडेल
 • या होम पेजवर तुम्हाला लाभार्थी यादी चा पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक करावे,केल्यावर तुमच्यासमोर १ नवीन पेज उघडेल. Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List
 • या पेजवर तुम्ही तुमचा जिल्हा निवडावा, यानंतर गाव निवडावे, यानंतर तुमच्यासमोर लाभार्थी यादी येईल.
 • यानंतर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेमध्ये तुमचे नाव बघू शकता. (Mahatma Jyotiba Phule Loan Waiver List)

Maharashtra Smart Ration Card: पात्रता, फायदे, ऍप्लिकेशन PDF संपूर्ण माहिती

हेल्पलाईन क्रमांक:

सहकार विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग,
358, संलग्नक, 3रा मजला, मंत्रालय, मादाम कामा रोड,
हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई – 400032.

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
शासनाचा GR इथे क्लिक करा
टोल – फ्री नंबर 8657593808 / 8657593809 / 8657593810
ई – मेल आयडी contact.mjpsky2019@maharashtra.gov.in
सरकारी योजना इथे क्लिक करा

Leave a Comment